Click here for reports

कोरोना संकट काळात आपण स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अविरत आणि अविश्रांत मेहनत घेतली. या कोरोना महामारी विरुध्दच्या लढ्यात आपण अग्रभागी राहून निस्वार्थ वैद्यकीय सेवा दिली. सर्वसामान्य, गोरगरीब रुग्णांकरिता धन्वंतरीच्या भूमिकेत आपण सेवाभावीपणे कार्यरत आहात; याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या मानवतेच्या सेवेबद्दल आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने – आपल्याला कोविड योध्दा’ या पुरस्काराने सन्मानित करत आहोत. आज रविवार, दि. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी आपणांस कोविड योध्या म्हणून ‘सन्मानित’ करत असताना आमच्या आणि संपूर्ण समाजाच्या मनात निरमीम कृतज्ञता भाव आहे. माणुसकीचे जपले भान, समाजाला दिलीत दिशा….. कर्तव्यतत्पर पावलांनीच उमलते नवी अशा….!! आपले मनःपूर्वक अभिनंदन !!

आनंदऋषी हॉस्पिटल, नगर